Monday, October 5, 2009

जुन्नर

हजारो वर्षांचा इतिहास लाभलेले जुन्नर हे सहयाद्री पर्वताय्च्या कुशीत वसलेले एक सुंदर शहर आहे। भारताच्या महाराष्ट्र जिल्ह्यातील पुणे तालुक्यात असलेले जुन्नर वीर मराठा छत्रपति शिवाजी महाराजांच्या शुरतेची आठवण करून देते। जुन्नरपासून जवळ असलेला शिवनेरी किल्ला जेथे महाराजांचा जन्म झाला, एक प्रेक्षणिय एइतिहासिक स्थळ आहे। अषठविनायकाँनपैकी लेन्याद्री (गिरीजात्मक) तसेच ओझर (विघ्नहेर) ही दोन गणपतीची रुपे पुजन्यासाठी जेथे दूर दूरून भक्त एकत्र येतात असे जुन्नर भक्तांसाठी तर जणू एक पवित्र स्थान आहे।

जुन्नर येथील जमीन अतिशय पिकाऊ असून तांदूळ, गहू आणि उस ही येथील प्रमुख धान्ये आहेत। शहरातील रविवारच्या बाजारात ताज्या भाज्या व फळांचे घड ग्राहकांच्या स्वागतार्थ सज्ज असतात। हिर्वळीची शाल पांघरलेले जुन्नर, अनेक धरणं लाभलेले जुन्नर पर्यटकांना आकर्षित करते। वडाज आणि माणिकदोह ही जुन्नर येथील लोकप्रिय सहलिंची ठिकाणे आहेत। जुन्नरमधील पुरातन नानेघाट लेण्या तर इतिहासातील काही पाने ताजी करुन जातात।

गणेश उत्सवाची जर खरी झलक पाहायची असेल तर जुन्नर सारखे दुसरे ठिकाण नाही। जुन्नर येथील सार्वजनिक गणेश उत्सवातिल सजावट डोळे भरून पाहिल्याशिवाय रहवाणार नाही। जुन्नर येथे अनेक चांगल्या शाळा असून, उत्तम महाविद्यालये देखिल आहेत। जुन्नर येथील वन्यजीवन अतिशय स्म्रुद्छ असून, येथे चित्यांची संख्या जास्त आहे। जुन्नर मधील हवामान प्रसन्न आणि थंड आहे।

जुन्नर चा इतिहास हा इसवी सन ९० पुर्वीचा असून, खुपच रोमांचक आहे। जुन्नर हे निसर्ग सानिध्यात वसलेले अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे। जुन्नर मध्ये एखाद घर असाव जेथे सहपरिवार सुट्टीची मजा लूटावी अस वाटाव असे शहर आहे जुन्नर। नैसर्गिक सुख-समृध्हीने नटलेल्या जुन्नरच्या तुम्ही प्रेमात पडला नाहीत तरच नवल।








No comments:

Post a Comment